Monday, March 29, 2021

Monday, December 21, 2020

Sunday, December 13, 2020

हे खरे खरे व्हावे-कविता शिकवितांना

GES e-Learning Program 2020

अंतर्गत e कंटेंट डेव्हलपर शिक्षकाचे अभूतपूर्व यश....

श्री. हातखंबकर सर

आपल्या संस्थेच्या एच. ए.एल. हायस्कूल इंग्रजी माध्यम मधील सह.शिक्षक श्री.हातखंबकर सरांनी इ . ६ वी च्या पाठ्य पुस्तकातील “सुलभ भारती” तील "हे खरे खरे व्हावे" या कवितेच्या youtube व्हीडिओ ला प्रत्यक्ष कविता लिहिणाऱ्या मराठीतील जेष्ठ साहित्यिका - लेखिका व कवयित्री असणाऱ्या प्राध्यापिका श्रीमती सुमती पवार यांनी व्हीडिओ अवडल्याचा कौतुकरुपी संदेश पाठविला आहे.

 ।।श्री।।

आशीर्वाद ....

. मा ... हातखंबकर सर ...

 स .न.वि.वि

सर.. 

तुमचे कोणत्या शब्दात कौतुक करावे हेच मला समजत नाही ...यू ट्यूब वर अचानक तुम्ही बनवलेला इ . ६वी च्या पाठ्य पुस्तकातील “सुलभ भारती” तील माझ्या “हे खरे खरे व्हावे “या कवितेचा व्हिडिओ माझ्या हाती लागला नि माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही . आपल्या कवितेचा एवढा सुंदर व्हिडिओ कुणी बनवेल याची मला कल्पनाच नव्हती ती तुम्ही प्रत्यक्षात आणली व एक अप्रतिम व्हिडिओ सादर करून समस्त विद्यार्थी वर्गा बरोबर मलाही आनंद सागरात डुंबवलं. ... सर , तुम्हाला धन्यवाद द्यावेत तेवढे थोडेच आहेत.सर .. पूर्ण व्हिडिओ पाहिल्यावर तुम्ही किती प्रचंड मेहनत घेतली आहे हे पाहून खरोखर आश्चर्य वाटते .उत्तम संगीत, उत्तम गायन व कवितेचे अप्रतिम रसग्रहण असा उत्तम त्रिवेणी संगमच तुम्ही साधला आहे. आपल्या सारखे कष्टाळू शिक्षक लाभणे त्या विद्यार्थ्यांचे केवढे भाग्य आहे . अशा शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांना .......कोणताही विषय कठीण वाटणारंच नाही.

सर ... अशा शिक्षकांचा मला व समस्त भारतीयांना गर्वच वाटायला हवा कारण भारताचे भावी आधारस्तंभ अशा शिक्षकांच्या हाती घडल्यास भारताच्या भविष्याची चिंता करण्याचे कारणच उरणार नाही ...

तुम्हाला तुमच्या कार्यात उत्तरोत्तर असेच यश मिळो अशी अभिलाषा व्यक्त करते आणि थांबते ..... 

Thank you very much sir 

Thanks a lot 

 प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

 सारंग  वाघ गुरूजी शाळे समोर

 पंपिंग स्टेशन रोड

   नाशिक ४२२०१३

.
\

 श्री. हातखंबकर सरांचे  हार्दिक अभिनंदन!

समन्वयक

श्री.विनोद देशपांडे

Monday, September 21, 2020

Sunday, July 26, 2020

विद्यार्थी पालकांच्या प्रतिक्रिया प्रश्न उत्तरे

GOKHALE EDUCATION SOCIETY

Ges e-Learning Program 2020

कोविड १९  समस्ये मुळे सर्वच क्षेत्रातील लोक त्रासले असतांना शिक्षण क्षेत्र सुद्धा याला काही अपवाद नाही. अश्या परीस्थित नामवंत शिक्षण संस्था म्हणून गोखले एजुकेशन सोसायटीने विध्यार्थ्यानपर्यंत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षण पोहचवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. 

या उपक्रम अंतर्गत संस्थेने विद्यार्थी तसेच पालक यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या त्या वाचून संस्थेला मोठा अभिमान वाटतो कि असे विद्यार्थी आणि पालक वर्ग संस्थेला लाभला आहे. संस्थेला आपल्या शिक्षकांचा पण गर्व वाटतो कि पारंपारिक शिक्षणाकडून आधुनिक शिक्षण द्यायला समर्थ आहे. आमच्संयाकडे १००% तंत्रस्नेही शिक्षक आहेत. याच शिक्षकांनी फक्त ३० दिवसात १००० पेक्षा जास्त व्हीडीओज नेर्माण केले आहेत. 
विद्यार्थी पालकांच्या प्रतिक्रिया आम्ही पब्लिश करीत आहोत 

विद्यार्थी पालकांच्या प्रतिक्रिया