GES e-Learning Program 2020
अंतर्गत e कंटेंट डेव्हलपर शिक्षकाचे अभूतपूर्व यश....
श्री. हातखंबकर सर
आपल्या संस्थेच्या एच. ए.एल. हायस्कूल इंग्रजी माध्यम मधील सह.शिक्षक श्री.हातखंबकर सरांनी इ . ६ वी च्या पाठ्य पुस्तकातील “सुलभ भारती” तील "हे खरे खरे व्हावे" या कवितेच्या youtube व्हीडिओ ला प्रत्यक्ष कविता लिहिणाऱ्या मराठीतील जेष्ठ साहित्यिका - लेखिका व कवयित्री असणाऱ्या प्राध्यापिका श्रीमती सुमती पवार यांनी व्हीडिओ अवडल्याचा कौतुकरुपी संदेश पाठविला आहे.
।।श्री।।
आशीर्वाद ....
. मा ... हातखंबकर सर ...
स .न.वि.वि
सर..
तुमचे कोणत्या शब्दात कौतुक करावे हेच मला समजत नाही ...यू ट्यूब वर अचानक तुम्ही बनवलेला इ . ६वी च्या पाठ्य पुस्तकातील “सुलभ भारती” तील माझ्या “हे खरे खरे व्हावे “या कवितेचा व्हिडिओ माझ्या हाती लागला नि माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही . आपल्या कवितेचा एवढा सुंदर व्हिडिओ कुणी बनवेल याची मला कल्पनाच नव्हती ती तुम्ही प्रत्यक्षात आणली व एक अप्रतिम व्हिडिओ सादर करून समस्त विद्यार्थी वर्गा बरोबर मलाही आनंद सागरात डुंबवलं. ... सर , तुम्हाला धन्यवाद द्यावेत तेवढे थोडेच आहेत.सर .. पूर्ण व्हिडिओ पाहिल्यावर तुम्ही किती प्रचंड मेहनत घेतली आहे हे पाहून खरोखर आश्चर्य वाटते .उत्तम संगीत, उत्तम गायन व कवितेचे अप्रतिम रसग्रहण असा उत्तम त्रिवेणी संगमच तुम्ही साधला आहे. आपल्या सारखे कष्टाळू शिक्षक लाभणे त्या विद्यार्थ्यांचे केवढे भाग्य आहे . अशा शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांना .......कोणताही विषय कठीण वाटणारंच नाही.
सर ... अशा शिक्षकांचा मला व समस्त भारतीयांना गर्वच वाटायला हवा कारण भारताचे भावी आधारस्तंभ अशा शिक्षकांच्या हाती घडल्यास भारताच्या भविष्याची चिंता करण्याचे कारणच उरणार नाही ...
तुम्हाला तुमच्या कार्यात उत्तरोत्तर असेच यश मिळो अशी अभिलाषा व्यक्त करते आणि थांबते .....
Thank you very much sir
Thanks a lot
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
सारंग वाघ गुरूजी शाळे समोर
पंपिंग स्टेशन रोड
नाशिक ४२२०१३
.
श्री. हातखंबकर सरांचे हार्दिक अभिनंदन!
समन्वयक
श्री.विनोद देशपांडे
Congratulations! Mr. Hatkhambkar Sir
ReplyDeleteCongratulations Sir
DeleteCongratulations sir💐💐💐💐
ReplyDeleteGreat work sir, congratulations
ReplyDeleteअभिनंदन सर!
ReplyDeleteCongratulations DK Hatkhambkar sir..
ReplyDeleteCongratulations Sir💐
ReplyDelete